“वात्सल्य - जेष्ठ नागरिक सर्वेक्षण”

  “वात्सल्य - जेष्ठ नागरिक सर्वेक्षण” या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील ६० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक व तत्सम अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे. तरी सर्वेक्षक आपल्याकडे सर्वेक्षणासाठी येथील तेव्हा आपण सदर उपक्रमासाठी आपला अनमोल सहयोग द्यावा.

डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.)
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी,नांदेड




उपक्रम राबविण्याचा उद्देश

६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठांचे वृद्धापकाळातील जीवन आनंददायी, सुखकर, आरोग्यवर्धक व तणावमुक्त करणे.

गरजू व पात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे.

ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व आर्थिक सुरक्षितता प्राप्त करून देणे.

ज्येष्ठ नागरिकांकडील कौशल्य, ज्ञान व अनुभव यांचा इतरांना फायदा करून देणे. तसेच त्यांच्या कौशल्याचा वापर करून त्यांचे उत्पन्न वाढविणे

ज्येष्ठ नागरिकांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावणे.

शासन निर्णय

महाराष्ट्र शासन - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विविध शासन निर्णय

#2007

आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम

#2010

आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ कल्याणासाठी नियम

#2013

शासन निर्णय- राज्याचे सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण

#2018

राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 ची अंमलबजावणी करण्याबाबत

#2019

शासन निर्णय -जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत

#2019

शासन निर्णय - ज्येष्ठ नागरिक राज्य परिषद (स्टेट कौन्सिल फॉर ओल्डर पर्सन) गठित करण्याबाबत